आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरुषीच्या आईला अटक न करण्यासाठी वरिष्ठांचा दबाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद - आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणात आरुषीची आई नूपुर तलवारविरुद्ध सबळ पुरावे असतानादेखील वरिष्ठांनी त्याची अटक होऊ दिली नाही, असा गौप्यस्फोट सीबीआय अधिका-याने उलटतपासणीवेळी विशेष न्यायालयात केला. सीबीआयचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एजीएल कौल यांच्या नेतृत्वाखाली दुसरे तपास पथक स्थापन करण्यात आले होते. आरुषीच्या आईविरुद्ध पुरेसे पुरावे होते, तर तिला का अटक केली नाही, असे बचाव पक्षाने कौल यांना विचारले. या वेळी कौल म्हणाले, महानिरीक्षक निलाभ किशोर यांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही तसेच अटक करण्यापासून रोखले. किशोर वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली नाही. त्यांच्या परवानगीशिवाय अटक होऊ शकत नाही, असे कौल म्हणाले. दंडाधिका-यांकडे सादर केलेल्या तपासबंद अहवालात नूपुर तलवारच्या गुन्ह्यातील सहभागाची माहिती देण्यात आली होती.