आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंसेक्स प्रथमच 30 हजार अंक पार करून बंद, निफ्टी सुद्धा रेकॉर्डब्रेक 9351 पॉइंट्सवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंसेक्स प्रथमच 30 हजार अंक पार करून बंद, निफ्टी सुद्धा रेकॉर्डब्रेक 9351 पॉइंट्सवर - Divya Marathi
सेंसेक्स प्रथमच 30 हजार अंक पार करून बंद, निफ्टी सुद्धा रेकॉर्डब्रेक 9351 पॉइंट्सवर
नवी दिल्ली - जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत मिळालेल्या चांगल्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटने आज सर्व विक्रम मोडीस काढले. सेंसेक्स बुधवारी 190 अंकांनी वधारून तब्बल 30,133 पॉइंट्सवर बंद झाला. सेंसेक्स 30 हजार अंकांचा आकडा पार करून बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचवेळी राष्ट्रीय शेयर मार्केट निफ्टीचा निर्देशांक सुद्धा 45 अंकांनी वाढून 9351 अंकांवर पोहचला. 
एफएमसीजी आणि ऑटो सेक्टरमध्ये वाढ झाली तरीही आयटी आणि फार्मा सेक्टरमध्ये घसरण नमूद झाली आहे. 
 
कसा राहिला आजचा व्यापार...
- स्टॉक एक्सचेंजमध्ये तेजी सुरू असताना सेंसेक्स सुरुवातीलाच 30 हजार अकांपेक्षा वर गेला. 30,133 निर्देशांक हा सेंसेक्सचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. 
- सेंसेक्सने आतापर्यंत 3 वेळा 30 हजारहून अधिक निर्देशांकांचा उच्चांक गाठला. मात्र, 30 हजारांचा आकडा पार करून बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
- यापूर्वी मार्च 2015 आणि 5 एप्रिल 2017 रोजी सेंसेक्सने 30 हजारांचा आकडा पार केला होता. तरीही, बंद होत असतानाचा हा उच्चांक आहे.
 
या कारणांमुळे स्टॉक मार्केटमध्ये तेजी
- कर सुधारणांत बदलांची अपेक्षा आणि चांगल्या परिणामांच्या उमेदीसह अमेरिकन बाजार तेजीत बंद झाले. मंगळवारी उद्योगजगतात डाओमध्ये 250 अंकांची वाढ झाली. तर, नेस्डॅक 6000 अंकांवर जाऊन बंद झाले.
- ब्लूचिप कंपन्यांच्या चौथ्या त्रैमासिकातील परिणाम अपेक्षेहून चांगले आले. त्यामुळे, खरेदी करणाऱ्यांचा कल वाढला. 
- याच दिवशी उद्योग जगतात एफआयआय आणि डीआयआयकडे खरेदीसाठी सुद्धा लोकांचा कल वाढला. परिणामी, बाजारात तेजी आली. 
- त्याच बाबींचा परिणाम गुरुवारी भारतीय बाजारपेठेत दिसून आला आहे. 
 
रुपया सुद्धा मजबूत
उद्योग जगतात आलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 27 पैश्यांनी मजबूत झाला. 1 डॉलरच्या तुलनेत रुपया 63.99 राहिला.
बातम्या आणखी आहेत...