आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटीर नेता यासिन मलिकची कुटुंबीयांसह हॉटेलबाहेर हकालपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीर मुक्ती मोर्चाचे (जेकेएलएफ) फुटीरतावादी नेते यासिन मलिक याला कुटुंबीयांसह दिल्लीतील एका हॉटेलमधून बाहेर हाकलण्यात आले. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा लचका तोडण्यासाठी आसुसलेल्या या नेत्याला काही तास रस्त्यांवर काढावे लागले.
मलिक कुटुंबीयांसह दिल्लीत आला होता. त्यामुळे तो आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी दिल्लीतील निझामुद्दीन भागातील एका हॉटेलमध्ये दोन खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या, पंरतु हॉटेल व्यवस्थापनाने मलिक आणि त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात्रीच हॉटेल खाली करण्यास सांगितले. व्यवस्थापनाच्या आदेशामुळे हॉटेलबाहेर पडावे लागल्यानंतर मित्राच्या घरी जाण्यापूर्वी तो अनेक तास रस्त्यावरच होता. मलिक हा काही दिवसांपूर्वी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याच्याबरोबर एका कार्यक्रमात सहभागी झाला होता.