आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्‍मीरात 'हुरियत'च्या रॅली फडकावला पाकिस्‍तानचा राष्ट्रध्वज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर (जम्मू-कश्मीर)- फुटीरतावादी नेता आणि हुरियत कॉन्फरन्सचे (मॉडरेट) चेअरमन मीरवाइज उमर फारुक यांच्या समर्थकांनी एका रॅलीत पाकिस्तानचा राष्‍ट्रध्वज फटकावला. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी‍ दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे झेंडे देखील फडकावले.
मीरवाइज उमर यांचे वडील मौलवी मोहम्मद फारुक आणि पक्षाचे नेते अब्दुल गनी लोन यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी श्रीनगरमध्ये रॅली काढण्यात आली. रॅलीत फुटीरतावादी संमर्थकांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला तसेच बहुतांश समर्थकांच्या हातात लश्कर-ए- तोयबाचा झेंडे होते.

...यामुळे मीरवाइज दिले नाही रॅलीत!
मीरवाइज यांना नजरकैद करण्‍यात आले आहे. त्यामुळे ते या रॅलीत उपस्थित राहू शकले नाही. 'मीरवाइज यांनी शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या राहात्या घरात काश्मीर पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. काश्मीरातील जनता शहीद नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना चेअरमन मीरवाइज यांनी नदरकैद करून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे 'हुरियत'चे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.