आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serious Condition: Childrens Are Dying From Encephalitis In Bihar

बिहारमध्ये पसरली महामारी; मृतांचा आकडा वाढला, शेकडो मुले अस्वस्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर- ब‍िहारमधील मुजफ्फरपूरमध्ये महामारी (Encephalitis) पसरली आहे. या महामारीमुळे शुक्रवारी (6 जून) सात मुले दगावली होती. केजरीवाल रुग्ग्णालयात तीन मुलांचा उपचार सुरु असलताना मृत्यु झाला तरी चौघांचा मृत्यु रुग्णालयात दाखल करण्‍यापूर्वी झाला.

बिहारमध्ये पसरलेल्या महामारीतील मृतांची संख्या 19 झाली आहे. मोठ्या संख्येने मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांग‍ितले. काही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री रामधनी सिंह यांच्या आदेशावरून आरोग्य सचिव डॉ.संजय कुमार, निदेशक प्रमुख डॉ.सुरेंद्र प्रसाद व सिव्हिल सर्जन डॉ.ज्ञान भूषण यांनी केजरीवाल व एसकेएमसीएचमधील परिस्थितीचा आढवा घेतला. आरोग्य पथकाने रुग्णालयात दाखल करण्‍यात आलेल्या मुलांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्याच्या कुटूंबियांची चर्चा केली.

सचिव डॉ. संजय कुमार यांनी केजरीवाल रुग्णालयातील चाइल्ड वार्डातील कूलिंग सिस्टिममध्ये सुधारणा करण्‍याची गरज असल्याचे सांगितले. यासोबत मुलांवर सुरु असलेल्या उपचाराचा सर्व खर्च सरकारतर्फे केला जाणार आहे. आतापर्यंत 19 मुलांला मृत्यु झाला असूनही राज्या महामारी पसरली असल्याचे सरकार मान्य करण्यास तयार नाही.