आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Service Revolver Of Slain DSP Zia ul Haq Recovered

हक हत्या : डीएसपीचे पिस्तूल सापडले दोन आरोपींचीही शरणागती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगढ - उत्तर प्रदेशातील कुंडाचे पोलिस उपअधीक्षक झिया-उल-हक यांच्या हत्येचा उलगडा होण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घटना शनिवारी घडल्या. हक यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, तर तत्पूर्वी बलिपूरच्या सरपंचाच्या हत्येतील दोन प्रमुख आरोपी पिता-पुत्र शरण आले आहेत.

हक यांच्या हत्येप्रकरणात अखिलेश सरकारमधील उत्तर प्रदेशचे मंत्री राजा भय्या यांचा हात असल्याचा संशय असून हत्येच्या आरोपानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी शनिवारी प्रतापगडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आसाराम यादव यांनी हक यांचे पिस्तूल सापडल्याचे सांगितले मात्र हे पिस्तूल कधी, कुठे सापडले याचा तपशील त्यांनी दिला नाही.पोलिस आणि सीबीआयचे दिवसभरातील हे दुसरे यश होते. तत्पूर्वी,बलिपूर गावातील सरपंच नन्हे यादव याच्या हत्येप्रकरणातील आरोपी पिता-पुत्र कामताप्रसाद पाल आणि त्याचा मुलगा अजयकुमार पाल यांनी सीबीआयसमोर शरणागती पत्करली. कुंडा येथील पंचायत भवनमधील सीबीआयच्या हंगामी कार्यालयात दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली. सरपंच नन्हे यादवच्या हत्येच्या एफआयआरमध्ये या पिता-पुत्रांची नावे होती.

पोस्ट मार्टेम अभ्यास
पोस्ट मार्टेम अहवालाचा अभ्यास करण्यासाठी सीबीआयचे पथक शनिवारी पुन्हा राजा भय्याच्या प्रतापगड येथील सीएमओ कार्यालयात गेले होते.हक आणि नन्हे यादवचा भाऊ सुरेश यांचा पोस्ट मार्टेम अहवाल या ठिकाणी आहे.2 मार्च रोजी हक आणि नन्हेसोबतच सुरेशचीही हत्या झाली होती.

खेळता-खेळता सापडले
सरपंच नन्हे यादवच्या घरापासून सुमारे 33 फुटांच्या अंतरावर एका झाडीत असलेल्या एका पाण्याच्या खड्ड्यात हक यांचे पिस्तूल सापडले. एका मुलगा खेळत होता. तो फळ तोडण्यासाठी झाडीत घुसला. झाडावरून काढताना ते फळ नेमके त्या खड्ड्यात पडले. फळ शोधताना पिस्तूल सापडले. त्या ठिकाणी एकाने सीबीआयला त्याची माहिती दिली.

चारपैकी तीन सापडले
सरपंचाच्या हत्येमधील चारपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अजितकुमार सिंग हा एकमेव आरोपी अद्याप हाती लागलेला नाही. शुक्रवारी सीबीआयने राजा भय्याचे निकटवर्तीय संजीव प्रताप सिंग ऊर्फ गुड्डू सिंग आणि राजीव प्रताप ऊर्फ राजू सिंग यांना ताब्यात घेऊन त्यांना घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले होते.

पिस्तूल की रायफल
नन्हे यादव यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत पोलिस उपअधीक्षक व सर्कल ऑफिसर हक यांची हत्या झाली.त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला की रायफलने गोळी झाडण्यात आली याचाही तपास सीबीआय करीत आहे.