आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sessions Court Denies Anticipatory Bail To Tejpal

गोवा क्राइम ब्रँचकडून तरुण तेजपाल यांना अटक; जामीन फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक शोषणप्रकरणी 'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांचा जामीन अर्ज पणजी सेशन कोर्टाने फेटाळला. गोवा गुन्हे शाखेकडून (क्राइम ब्रँच) त्यांना अटक केली आहे.

तरुण तेजपाल यांच्या जामीन अर्जावर आज (शनिवार) झालेल्या सुनावणीत प्रधान आणि सत्र न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी रात्री आठच्या सुमारस निर्णय दिला.

यावेळी तेजपाल यांची पत्नी आणि बहीण त्यांच्यासोबत न्यायालयात उपस्थित होत्या. यावेळी तेजपाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी वकीलाने जोरदार प्रहार केला आहे. पीडित तरुणी पहिल्या दिवसापासून आपल्या वक्तव्यावर ठाम असून तेजपाल सरड्यासारखे रंग बदलत आहेत, असे वकीलाने न्यायालयाला सांगितले.
अनुजा प्रभुदेसाई यांनी गीता लुथरा यांना तेजपाल यांची बाजू मांडण्यासाठी सुमारे तासभराचा अवधी दिला. तेजपाल यांना अपमानकारक आणि नामुष्कीच्या वातावरणात अटक करण्यात आली. यामुळे त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि पत्रकार कम्युनिटीला मोठा धक्का बसला आहे. त्यांना अटक टाळायची नव्हती. त्यांनी केवळ अटकेची तारिख पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला आहे.

तेजपाल यांच्या वतीने बोलताना गीता लुथरा म्हणाल्या, की जोपर्यंत पोलिस आरोपपत्र दाखल करीत नाहीत, तोपर्यंत माझी गोव्यात थांबण्याची तयारी आहे. मी बंगळूरुलाही थांबू शकतो. कोर्ट सांगेल त्या ठिकाणी थांबण्याची माझी तयारी आहे. हवा असेल तर माझा पासपोर्ट जप्त करावा. मी एखाद्या बॉन्डवर सही करण्यासही तयार आहे.
मात्र, न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी तेजपाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दुपारी 4.30 वाजता निकाल येणे अपेक्षीत होते मात्र तब्बल तीन-साडेतीन तास उशिरा अर्जावर निर्णय देण्यात आला.