आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छटपूजेची खरेदी करणाऱ्यांवर विजेची तार पडून ७ मृत्युमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबनी- बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील जयनगरमध्ये विजेची हाय टेन्शन तार पडून सात जणांचा मृत्यू तर १० गंभीर जखमी झाले. मृत कौरया गावातील रहिवासी आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.

मधुबनीचे पोलिस अधीक्षक मोहंमद अख्तर हुसेन म्हणाले, मंगळवारी छट पूजेच्या खरेदीसाठी कौरया गावातील नागरिक जयनगरच्या बाजारपेठेत आले होते. यादरम्यान ११ हजार व्होल्टची तार लोकांवर पडली. दुर्घटनेनंतर बाजारात गोंधळ उडाला. सात जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. छट पूजेच्याआधी मधुबनीमध्ये शोककळा पसरली आहे. नितीश यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाइकांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.