आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींच्या सात म्होरक्यांची झारखंडमध्ये शरणागती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर - नक्षलवादी चळवळीतील सात म्होरक्यांनी बुधवारी पूर्व सिंहभूम जिल्ह्यात पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांना पकडून देणाऱ्यांना ४३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते.

शरण येणाऱ्यांत एका महिलेसह कान्हू मुंडा आणि फोगरा मुंडा यांचा समावेश आहे. या दोघांच्या डोक्यावर अनुक्रमे २५ लाख रुपये आणि १० लाख रुपयांचे बक्षीस होते. इतर चौघांवर प्रत्येकी २ लाख बक्षीस होते. या सातही जणांनी कान्हूच्या जियान या गावात पोलिस अधीक्षकांसमोर शरणागती पत्करली. कान्हू हा दोन दशकांपूर्वी नक्षलवादी चळवळीत सहभागी झाला होता. तो झारखंड-बंगाल-ओडिशाचा विभागीय सचिव होता. तो घाटीशाला येथून तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या सीमा भागातून काम करत होता. नक्षलवाद्यांनी केलेल्या विविध हल्ल्यांत कान्हू आणि फोग्रा हे पोलिसांना हवे होते. 
बातम्या आणखी आहेत...