आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-नेपाळ सीमेवर सहा महिने फुलणारी सात गावे, हिमवर्षावामुळे करतात स्थलांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटी - (पिठोरागड उत्तराखंड)- भारत चीन व नेपाळ सीमेवरील उत्तराखंड राज्यातील (जि. पिठोरागड) कैलास मानसरोवर व आदिकैलास यात्रा मार्गावरील सात गावे वर्षातील सहा महिन्यांसाठीच फुलतात. नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांत सर्व गावे रिकामी झालेली असतात. सातही गावांतील नागरिकांची निवाऱ्याची दोन ठिकाणे आहेत. हिमवर्षाव सुरू होताच सातही गावांमधील नागरिक धारचुला (जि. पिठोरागड) येथे येतात. या गावांमधील नागरिकांची उपजीविका दोन्ही यात्रांवर अवलंबून असते. यात्रेकरूंसह सुरक्षा दलांना सेवा पुरवण्यातून ग्रामस्थांची रोजीरोटी चालते.
भारत-चीन व नेपाळ सीमेवरील हिमालयाच्या कुशीत वसलेली सात गावे तशी अतिदुर्गम पहाडात. निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावांना मोबाइल गावे म्हणूनही संबोधले जाते. सहा महिने गावांमध्ये वर्दळ असते व उर्वरित सहा महिने गावे आेस पडलेली असतात. संबंधित गावांमध्ये शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी बांधलेले वाडे आजही सुस्थितीत आहेत. समुद्रसपाटीपासून सहा ते सात हजार फूट उंचीवर बारा महिने नागरिक राहू शकतात. परंतु त्यापेक्षा जास्त उंचीवर मात्र अर्धवर्ष निवास करतात.

असे होते स्थलांतर
गावांमध्ये सौका भोटिया या अनुसूचित जमातीचे लोक राहतात. सैन्यदलात जवान ते अधिकारी पदांवर घरातील व्यक्ती असून अनेक गावांमध्ये आयएएस व आयपीएस आहोत. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये प्रत्येकजण आपल्या गावी बुढाणीपूजा नामक पूर्वजांच्या नावे विधीसाठी येतो.
गावांचे महत्त्व : सातही गावांमधील नागरिकांची उपजीविका दोन्ही कैलास यात्रा व सुरक्षा दलांवर अवलंबून आहे. यात्रेकरूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था करणे, घोडे, खच्चर पुरविणे, सामानाची वाहतूक करणे, रस्त्यांवरील बर्फ काढणे, सुरक्षा दलांना नियमित लागणारे धान्य, फळे भाजीपाला , बकऱ्या, मेंढ्या, पुरविणे, रस्ते निर्मितीत ग्रेफला मदत नागरिक करतात. गरम कपड्यांची विक्री व मोठ्या शहरांना पुरवठा केला जातो. परिसरात सैन्यदल, आयटीबीपी, एसएसबी. ग्रेफ, वनविभाग, कुमाऊ मंडळ विकास निगम आदी विभागातील कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे.

उत्तराखंडमधील ७ गावांचे वेगळेपण
सर्व गावे कैलास मानसरोवर व आदिकैलास यात्रा मार्गावरील
>बुद्धी (उंची १० हजार फूट) लोकसंख्या ८० कुटुंब (३५० नागरिक)
>गर्ब्यांग (११ हजार फूट) ३० कुटुंब (१५०) (भूस्खलनामुळे गावातील अनेक कुटुंबांचे सीतारगंज (उत्तराखंड) येथे स्थलांतर केले. उर्वरित नागरिक मात्र येथेच राहतात)
>नेपलच्यू (११४०० फूट) ६० कुटुंब (२५०)
>गुंजी (११५०० फूट) १०० कुटुंब(५००)
>नाभी (११६००) ६५ कुटुंब (३००)
>राँकाँग (११७००) ६५ कुटुंब (३००)
>कुटी (१३०००) ७० कुटुंब (४००)
कैलास मानसरोवर यात्रा गुंजी येथून कालापाणी, नाभीडांग व लिपुपासमार्गे चीनला तर आदिकैलास यात्रा गुंजी येथून नाभी, रॉकॉँग, कुटी, जॉलिंगकाँगला जाते.
गावाच्या नावावरून बुद्धीयाल, गर्बीयाल, गुंजीयाल, नाभियाल, नेपलच्यूल, कुटीयाल अशी आडनावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...