आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या वरातीत आलेल्या सात वर्षीय मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीकरी/अलवर- लग्नाच्या वरातीत आलेल्या एका सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजस्थानातील कॅथवाडा पोलिस ठाण्यातंर्गत येणार्‍या मातूकी गावात घडली.

अज्ञात नराधमांनी ‍मुलीवर बलात्कार करून तिला सीकरी येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात फेकून फरार झाले होते. सोमवारी सकाळी पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. तिच्यावर जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी गोविंदगड अलवर येथील एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.

न्याणा (गोविंदगड) जिल्ह्यातील अलवर येथून रविवारी पीडित मुलगी लग्नाच्या वरातीत आली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ आणि वडील आले होता. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वरात एका सरकारी शाळेत पोहचली होती. पाहुण्यांच्या स्वागताचा कार्यक्रम सुरु असताना संबंधित मुलगी बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. परंतु ती आढळून आली नव्हती.