आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: राजस्थान: मंगल कार्यालयाची भिंत कोसळून 5 चिमुरड्यांसह 25 ठार, 60 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरतपूर- राजस्थानात अचानक आलेल्या वादळामुळे एका मंगल कार्यालयाची भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ महिला आणि पाच चिमुरड्यांचा समावेश आहे. भरतपूर येथील सेवर रोडवरील अन्नपूर्णम मंगल कार्यालयात काल (बुधवारी) रात्री साडे 10 वाजता  ही दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेत 60 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचीही भीती वर्तवली जात आहे. दुर्घटना घडली तेव्हा कार्यालयात‍ जवळपास 800 जण उपस्थित होते.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्याला सुरूवात करून जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले. चेंगराचेंगरी झाल्यामुळेही काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी मंगल कार्यालयाचे संचालक भरतलाल शर्मा यांचे बंधू लक्ष्मण प्रसाद यांना ताब्यात घेतले आहे.


भिंत आणि टिनशेड कोसळल्याने 50-60 जण दबले...
- किरोडीलाल सैनी यांची कन्या आणि जयपूरचे धर्मेंद्र सैनी यांच्या चिरंजिवाचा विवाह समारंभ भरतपूर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात सुरु होता.
- रात्री जवळपास 10 वाजता विवाहाचा विधी पार पडत असताना अचानक वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे मंगल कार्यालयाची भिंत आणि टिनशेड कोसळले. त्याखाली शेकडो लोक दबले गेले. भिंत कोसळली तेव्हा लोक जेवण करत होते.
- जखमींना उपचारासाठी आरबीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

अनेकांची प्रकृती चिंताजनक...
- आरबीएम हॉस्पिटलमध्ये बाबूलाल, राजकुमारी, जवाहर सिंह, सचिन ओझा, दीपक, हरस्वरूप, उदयसिंह, रामकुमार, जोगेंद्रसिंह, सुमन, महेंद्रसिंह, जुगल सिंह यांच्यावर उपचार सुरु आहेत.
- गंभीर जखमींना तारा महेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे. त्यात विक्रम सिंह आणि अजय सिंह यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मोठा आवाज झाला अन् हाहाकार उडाला...
प्रत्यक्षदर्शी लक्ष्मण प्रसाद यांनी सांगितले की, लग्नाला जवळपास 800 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. अचानक वादळी वार्‍यासह पाऊस झाला आणि मोठा आवाज झाला. त्यावेळी लोक जेवण करत होते. तितक्यात मंगल कार्यालयाची भिंत आणि टिनशेड त्यांच्या अंगावर कोसळले. त्याखाली लहान मुलांसह शेकडो महिला-पुरुष दबले गेले. वीज खंडीत सर्वत्र हाहाकार उडाला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...