आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडापासून कटून दूर पडले होते शिर, जखमींचा आक्रोश, एवढा भीषण होता अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिकानेर - वस्तीपासून 4 किमी अंतरावर सुजाणगढ रोडवर मंगळवारी संध्याकाळी पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या बस आणि पिकअपमध्ये जबरदस्त धडक झाली. अपघातात पिकअपमध्ये स्वार 9 जण जागीच ठार झाले, तर 21 जण जखमी झाले. पिकअपमध्ये 30 हून जास्त प्रवासी भरलेले होते. अपघाताचे दृश्य एवढे भयानक होते की, घटनास्थळी एका व्यक्तीचे शिर धडापासून कटून वेगळे पडले होते. पिकअपमधून उसळून लांब फेकल्या गेलेले प्रवासी वेदनांमुळे विव्हळत होते. एक महिला आणि 4 लहान मुले तर गाडीतच बेशुद्ध पडलेले होते.

 

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होती बस...
- पिकअपमध्ये स्वार प्रवासी आपल्या नातेवाइकाच्या तेरवीला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या गावी परतत होते. सोमलसरजवळ समोरून येणाऱ्या एसटी बसला त्यांची जोरदार धडक बसली.
- प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, एसटी बस एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना अचानक समोर पिकअप आली. ड्रायव्हरचा निष्काळजीपणाच अपघाताला कारणीभूत झाल्याचे यावरून स्पष्ट होते.
- पोलिसांच्या मते, 6 जखमींनी जागेवरच दम तोडला. तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी थांबून जखमींना आधार दिला आणि आपल्या वाहनांमधून हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
- बस ड्रायव्हर या अपघातानंतर फरार झाला. बस ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अशी आहेत मृतांची नावे
- मांगीलाल (65) रा. देसलसर, दानाराम (42) रा. देशनोक, मुकेश (12), सुगनीदेवी (55), सीताराम (25), सुवरी (17) सर्व रा. नोखा, सुशीला (20) खरिया-बास लूणकरणसर, रावणाराम (75) व मालाराम (35) यांचा मृत्यू झाला.


जखमींची नावे 
बुधराम (18), मनोज (13), मंजू (3), ओमप्रकाश (23), संतोष (40), पप्पूराम (35), देवीकिशन (16), मुरली (8), ईश्वरराम (40) सर्व रा. नोखा, डूंगरराम (26), सुशीला (20) व नरसी (5) सर्व रा. लूणकरणसर, सांवरराम (28) रा. देशनोक, पूर्णाराम (19) रा. पांचू, रोशनी (1) रा. मालासर, काली (25) सुमन (18) रा. देशनोक, गीता (20), श्रवण (25) मालासर, सुमन (18) रा. देशनोक आणि मोहनलाल (31) रा. सांडवा। 6 मृतदेहांना पोस्टमॉर्टमनंतर नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले.


50 हजार रुपये देण्याची घोषणा
- या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पथकासह घटनास्थळी पोहोचले. संध्याकाळी कलेक्टर आणि एसपींनीही घटनेचा आढावा घेतला. मृतांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 50-50 हजार देण्याची घोषणा करण्यात आली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अपघाताशी निगडित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...