सोनीपत- हरियाणातील सोनीपतचे कॉंग्रेसचे माजी आमदार विधायक देवराज दिवान यांच्या फार्महाऊसवरील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी मंगळवारी पहाटे भांडाफोड केला. पोलिसांनी फार्महाऊसवरून 57 जणांना अटक केले आहे. यात पाच महिलांचा समावेश आहे. जवळपास सगळेच आक्षेपार्ह अवस्थेत होते. याशिवाय पोलिसांनी सहा लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
पोलिसांनी पहाटेच टाकला फार्महाऊसवर छापा...
माजी आमदार दिवान यांच्या फार्महाऊसवर सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज (मंगळवारी) पहाटे सापळा रचून दिल्ली मार्गावरील सेक्टर-3 मध्ये असलेल्या फार्महाऊसवर छापा टाकाला. फार्महाऊसवर खुलेआम गोरखधंदा सुरू होता. तसेच काही जण जुगार खेळत होते. पोलिसांनी सगळ्यांना अटक केले असून फार्महाऊस सील करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, कॉंग्रेसचे नेते देवराज दिवान यांनी झटकले हात...