आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाटणा- बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात ब्यूटीपार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा सुरु असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उच्चभ्रु परिसर समजला जाणारा लोकनायक जयप्रकाश भवन आणि एसपी वर्मा परिसरातील तीन ब्यूटीपार्लरवर छापेमारी करून पाटणा पोलिसांनी देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड केला आहे.या छापेमारीत चार तरुणींसह 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना या छापेमारीत मोठे यश प्राप्त झाले आहे. ते म्हणजे, देहविक्री व्यवसायातील मास्टर किंग राजकुमार पाठक यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिस गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या शोधात होते. अटक करण्यात आलेल्या चार तरुणींना महिला पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. आरोपींकडून मोठे खुलासे झाले असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तसेच पाटण्यातील बड्या लोकांचीही नावे समोर आली आहेत. परंतु याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. पूर्वीपासून पाटणा शहरात ब्युटी आणि मेंस पार्लरच्या नावाखाली 'सेक्स रॅकेट' सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'देहविक्री व्यवसायातील मास्टर किंग राजकुमार पाठक अटकेत'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.