आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाहेर स्पा सेंटरचा बोर्ड, आतमध्ये सुरु होते सेक्स रॅकेट; असे तोंड लपवत बाहेर निघाल्या मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा (उत्तर प्रदेश) - ताजमहालापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या बिल्डिंगमध्ये एक भाजप नेता स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी ६ मुलींसह काही ग्राहकांना अटक केली आहे. त्यासोबतच रुममधून आक्षेपार्ह्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
सपा नेत्याच्या हॉटेलमध्ये भाजप नेता चालवत होता सेक्स रॅकेट
- समाजवादी पक्षाचा नेता पप्पू यादव याच्या हॉटेल डिलक्स प्लाझामध्ये सेक्स रॅकेट चालवले जात होते.
- हॉटेलची बिल्डिंग भाजप नेता दीप बघेल याने भाड्याने घेतली होती.
- हॉटेलबाहेर त्याने स्पा सेंटरचा बोर्ड लावला होता. स्पा सेंटरच्या नावाखाली आतमध्ये तो सेक्स रॅकेट चालवत होता.
- दिल्लीतील एनजीओ रेस्क्यू फाउंडेशनच्या टीमने बऱ्याच दिवसांपासून आग्रामधील या स्पा सेंटरवर लक्ष ठेवले होते.
- त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, येथे देह व्यापारासाठी मुलींवर बळजबरी केली जात होती.
- रेस्क्यू फाउंडेशनने स्पा सेंटरवर नजर ठेवली. येथील प्रत्येक हलचालीची त्यांनी नोंद घेतली. स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवून मसाज सेंटरच्या नावाखाली होत असलेला देह व्यापाराचा भांडाफोड त्यांनी केला.
- आग्रा येथील पोलिस अधिक्षक प्रीतिंदर सिंह यांनी स्पा सेंटरवरील छाप्याची माहिती दिली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या मुली आणि ग्राहक...
बातम्या आणखी आहेत...