आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Racket Exposed In Lucknow Gomtinagar Uttar Pradesh

लखनौ सेक्स रॅकेट: ऑनलाइन बुकिंग करुन कुठेही पाठवल्या जात होत्या मुली, 7 अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील उच्चभ्रू वसाहत गोमतीनगर येथील सेक्स रॅकेटचा सोमवारी रात्री पर्दाफाश झाला. सोमवारी रात्री पोलिसांनी येथे छापा टाकला यात तीन तरुणींसह चार ग्राहकांना अटक करण्यात आली. यावेळी ग्राहकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आणि पोलिसांवर हात टाकला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आसपासच्या पोलिस स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात पोलिस हजर झाले. त्यानंतर सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, गोमतीनगर पोलिस स्टेशनांतर्गत विशालखंड येथील गेस्ट हाऊसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवले जात होते. गेल्या एक महिन्यापासून येथे हे कुकृत्य सुरु होते. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर याचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी ट्रॅप लावला आणि सोमवारी रात्री येथे छापा टाकला.
विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍याचे गेस्ट हाऊस
गोमतीनगरमध्ये ज्या गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापार सुरु होता, ते अलाहाबाद विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकार्‍याच्या मालकीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एक लाख रुपये दरमहा भाड्याने गेस्टहाऊस देण्यात आले होते. या गेस्ट हाऊसमध्ये आठ रुम आहेत. येथे रोज मुली आणल्या जात होत्या आणि नंतर ग्राहक येत होते. सेक्स रॅकेट चालवणारा दलाल दोन तासांसाठी सहा हजार रुपये चार्ज करत असल्याचे सांगितले जाते.
संपूर्ण भारतात पुरवल्या जात होत्या मुली
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिला या जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि गाजियाबाद येथील आहेत. मात्र, या सेक्स रॅकेटचा सुत्रधार ऑनलाइन बुकिंग करीत होता आणि देशभर मुली परवत होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसे चालत होते रॅकेट
फोटो - पोलिसांच्या ताब्यातील तरुणी आणि ग्राहक