फोटो - रांचीमधून अटक करण्यात आलेल्या कॉल गर्ल्स
रांची - सेक्स रॅकेटप्रकरणी रांची पोलिसाच्या ताब्यात असलेली प्रमुख आरोपी रीना अधिकारी हिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तारा शाहदेव प्रकरणातील आरोपी रकीबुल हसन उर्फ रंजीत सिंह कोहलीशी तिची जवळीक होती. रंजीतच्या सांगण्यावरून ती स्टेशन रोडवरील एकोर्ड हॉटेलच्या खोली क्रमांक 307 मध्ये जात असल्याची कबुलीही तिने दिली आहे. त्याठिकाणी अनेक हाय प्रोफाइल लोकांची ये-जा होती असेही तिने सांगितले आहे.
तिने अनेकदा त्याठिकाणी मुलीही पाठवल्या होत्या. झारखंड सरकारच्या एका मंत्र्यासाठीही त्याठिकाणी मुली पाठवल्याचे तिने सांगितले. मात्र, पोलिसाने अद्याप या मंत्र्याचे नाव उघड केलेले नाही. सेक्स रॅकेट चालवणा-या रीनाच्या या खुलाश्याने रकीबुल हाय प्रोफाइल लोकांशी संपर्क साधण्यासाठी मुलींचा वापर करायचा हे सिद्ध झाले आहे.
अनेक महिन्यांपासून सुरू होते सेक्स रॅकेट
दिल्लीच्या सोनू पंजाबन या टोळीतील रीना अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून रांचीमध्ये सेक्स रॅकेट चालवत होती. तिला रविवारी पोलिसांनी अटक केली. तिच्याबरोबर इतर आठ कॉल गर्ल्सही पकडण्यात आल्या होत्या. या सर्वांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांनी रीनाचा फोनही जप्त केला असून त्याचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS