आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनीच इंटरनेटवर अपलोड केला प्रेमीयुगलाच्या प्रणयाचा व्हिडिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळ- मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातील एका प्रेमयुगलाच्या प्रणयाचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंडिया रिझर्व बटालियनच्या (आयआरबी) पोलिसांनीहा प्रताप केला आहे.

खुगा बांधजवळ प्रेमयुगल प्रणयक्रीडेत मग्न असताना पोलिसांनी त्यांना पकडले होते. प्रेमयुगुलाला अटक करून पोलिस थांबले नाहीत, तर प्रेमयुगुलाला दमदाटी करून पुन्हा प्रणयक्रीडा करण्यास भाग पाडले. पोलिसांनी ते व्हिडिओ रेकॉर्ड करून इंटरनेटर अपलोड केले. आयआरबीच्या पोलिसांनी यापूर्वीही परिसरातील महिलांची छेड काढली होती.

या प्रकरणी चार पोलिस कर्मचार्‍यांना अटक करण्‍यात आली आहे. कोर्टाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, घटना घडलेला खुगा बांध परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्‍यात आला आहे. गस्त घालणार्‍या आयआरबीच्या चार पोलिसांना एक प्रेमयुगुल प्रणयक्रीडा करताना आढळून आले होते. आयआरबीच्या पोलिसांनी यापूर्वीही अनेक महिलांना बेअब्रु केल्याचा आरोप परिसरातीना नाग‍रिकांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन रस्त्यावर उतरले होते. तसेच त्यांनी चुराचंदपूर पोलिस ठाण्यावरही मोर्चा नेला होता. पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या लाठीमारमध्ये 20 जण जखमी झाले आहेत.