आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला खेळाडूला 3 दिवस हॉटेलमध्ये डांबून ठेवले, MMS व्हायरल करण्याची दिली धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ताइक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या (टीएफआय) संयुक्त सचिवाला अटक झाली आहे. मात्र, आता या प्रकरणाने यू-टर्न घेतला आहे. अधिकार्‍यावर आरोप करणार्‍या पीडितीने आपले वक्तव्य फिरवले आहे.

काय आहे हे प्रकरण? 
-ताइक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचे (टीएफआय) संयुक्त सचिव संजय शर्मा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या पीडित महिला खेळाडून यू-टर्न घेतला आहे. तिने आपले वक्तव्य फिरवले आहे.  
-पीडितेने सांगितले की, तिला संजय शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्‍यासाठी धमकावण्यात आले होते.  
-पीडितेची मैत्रिण आणि तिचा बॉयफ्रेंड दिवाकर उर्फ सानू यांने तिला संजय शर्मा यांच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरण एफआयआर दाखल करण्यास धमकावले होते. तिने असे केले नाही तर अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धकमीही दिली होती.
 
एफआयआर दाखल करण्‍यास मजबूर केले... 
-पीडितेने सांगितले की, ती राष्ट्रीय पातळीवरील ताइक्वांडो खेळाडू आहे. तिने अनेकदा गोल्ड मेडलही पटकावले आहे. 
-पीडिता, संजय शर्मा यांना 2012 पासून ओळखते. ते तिचे प्रशिक्षकही होते. 
-संजय शर्मा यांनी कधीही लैंगिक शोषण केले नसल्याचे पीडितेने रांची पोलिसांना सांगितले आहे.  

पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफ्समध्ये पाहा, तीन दिवस दिल्लीत हॉटेलमध्ये डांबून केले होते टॉर्चर... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...