आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापू ‘जेल योगा’तच; स्वामींनी युक्तिवाद करूनही जामीन नाकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणातील आरोपी आसारामबापू यांची जामिनासाठीची याचिका न्यायालयाने शनिवारी सहाव्यांदा खारीज केली. या वेळी आसाराम बापूंची बाजू भाजप नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली होती. तरीही त्यांना जामीन नाकारण्यात आला. आसाराम २०१३ पासून जोधपूर तुरुंगात आहेत.
सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी जोधपूर सत्र न्यायालयात आसारामांच्या जामिनासाठी जवळपास एक तास युक्तिवाद केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी शनिवारपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. न्यायालय आपल्या अशिलाला जामीन देईल, अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केली होती, पण तसे झाले नाही. स्वामींनी म्हटले होते की, आसाराम यांच्या विरोधात गैरधार्मिक शक्तींनी खोटे आरोप लावले आहेत. त्यांना परिस्थितीजन्य साक्षींच्या आधारावर कैदेत ठेवण्यात आले आहे. जर आसाराम यांची जामीन याचिका खारीज झाली तर आपण त्याविरोधात उच्च न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी सांगितले होते. सरकारी पक्षाचे वकील पी. सी. सोळंकी यांनी आसाराम बापूंच्या जामिनाला विरोध केला. अपराध झाल्याच्या परिस्थितीवर नजर टाकावी, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली होती. स्वामी यांनी २३ एप्रिलला आसाराम बापूंची तुरुंगात भेट घेऊन त्यांची बाजू मांडण्याचे आश्वासन दिले होते.
बातम्या आणखी आहेत...