आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sexual Assault Case: Complaint Registered Against Ganguly In Police Station

लैंगिक शोषण प्रकरण: गांगुलींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - लैंगिक शोषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोककुमार गांगुली यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. एका एनजीओने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. एका प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने गांगुलींवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी होत होती. बुधवारी ‘भारत बचाओ संगठन’ने हारे स्ट्रीट पोलिस ठाण्यात गांगुलींविरुद्ध तक्रारपत्र सोपवले. पोलिस उपायुक्त डी.पी. सिंह यांनी त्यास दुजोरा दिला. गांगुली सध्या प. बंगाल मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत.
एनजीओचे अध्यक्ष विनीत रुईया यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तृणमूलचे प्रवक्ते डेरेक ओ’ ब्रायन म्हणाले की, गांगुलींनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. दरम्यान आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा गांगुलींनी केला आहे.