आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचार प्रकरण: आसाराम बापू आणखी काही दिवस तुरुंगातच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण होऊ शकली नाही. बुधवारी होणार्‍या सुनावणीत जामिनाचा निर्णय न झाल्यास बापूंना आणखी काही दिवस तुरुंगातच काढावे लागतील.


मंगळवारी आसाराम बापू यांच्या वकिलाने जोधपूरच्या न्यायालयात त्यांची बाजू मांडली; परंतु सरकारी वकील त्यांची बाजू मांडण्यास अपयशी ठरले. ते बुधवारी बाजू मांडणार आहे. आसाराम बापू सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बुधवारी जामीन मिळाला नाही तर त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल.
आसाराम बापूंच्या वकिलांनी याप्रकरणी सांगितले की, तक्रारीत बलात्काराचा आरोप करण्यात आला नाही. पीडितेची वैद्यकीय चाचणी दिल्लीतच का करण्यात आली आणि परीक्षणासाठी फक्त पीडितेच्या आईलाच का सोबत नेण्यात आले, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.


जलद निर्णय द्या
आसाराम बापूंच्या अटकेनंतर आता लवकर निर्णय देण्याची मागणी होऊ लागली आहे. अशा प्रकारच्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणांचा निपटारा जलद न्यायालयात व्हायला हवा, अशी मागणी कायदेतज्ज्ञांनी केली आहे. विदेशी पर्यटकाच्या प्रकरणात असा निर्णय झाल्याचा हवालाही तज्ज्ञांनी दिला आहे. या प्रकरणात दहा दिवसांतच निर्णय देण्यात आला होता. आसाराम बापूंचे प्रकरण र्शद्धेशी निगडित असल्याने ताबडतोब सत्य बाहेर यावे, असे त्यांच्या सर्मथकांचेही मत आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाचे अँड. धर्मवीर ठोलिया यांनी व्यक्त केली