आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यामध्ये लैंगिक शिक्षणाचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - बलात्कार आणि लैंगिक छळाच्या घटना टाळण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये लैंगिक शिक्षण बंधनकारक करण्याची शिफारस सरकारने स्थापन केलेल्या समितीने केली आहे.


वास्को शहरात जानेवारी महिन्यात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आमदार विष्णू सूर्य वाघ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. अनेक पालक सरकारी किंवा खासगी नोकरी करतात. ते विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत सोडतात व सायंकाळी परत येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर नियंत्रण राहत नाही. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण वेळ शाळा करण्याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.