आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिडकांडाचा आरोपी खासदाराची सुटका, शेकडो वाहनांच्या ताफ्यात निघाली शहाबुद्दीनची स्वारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागलपूर- बिहारमध्ये 'जंगलराज'चा चेहरा मानला जाणारा राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहंमद शहाबुद्दीनची ११ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाली. हत्या आणि अपहरणासह सुमारे ४० पेक्षा जास्त प्रकरणांचा आरोपी असलेल्या शहाबुद्दीनच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राजदच्या नेत्यांसह हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. ३०० पेक्षा जास्त वाहनांच्या ताफ्यात तुरुंगापासून ते सिवान या त्याच्या गावापर्यंत त्याची भव्य मिरवणूकही निघाली होती. सिवानला रवाना होण्यापूर्वी शहाबुद्दीनने आपण कधीच बदलणार नाही, असे मतही व्यक्त केले. शहाबुद्दीन पुढे म्हणाला, २६ वर्षांपासून लोकांनी आपल्याला याच रूपात स्वीकारले आहे. १३ वर्षांपासून मी गावी गेलेलो नाही. तरीसुद्धा माझ्या सुटकेवेळी लोकांनी इतकी गर्दी केली. फक्त लालूप्रसाद यादव हेच माझे नेते आहेत. त्यांच्यासोबत मी नरकातही जायला तयार आहे. नितीशकुमार हे परिस्थितीमुळे मुख्यमंत्री बनले आहेत. स्वबळावर ते २० जागाही जिंकू शकत नाहीत, असे राजकीय विधान करून त्याने खळबळ उडवून दिली आहे. शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास त्यांचा ताफा सिवानला पोहोचला. दरम्यान, मुजफ्फरनगर आणि बेगुसरायमध्ये चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

नितीशकुमारांची दारूबंदी म्हणजे अंधा कानून
मुजफ्फरनगरमध्ये भोजनासाठी थांबल्यानंतर शहाबुद्दीन म्हणाला की, नितीशकुमारांनी लागू केलेली दारूबंदी म्हणजे “अंधा कानून’ आहे. मुलगा दारू पीत असेल तर बापाला शिक्षा होणार.

४० खटले प्रलंबित
पाटणा उच्च न्यायालयाने सिवानमधील अॅसिड हत्याकांडाचा साक्षीदार राजीव रोशन यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर रोजी शहाबुद्दीनला जामीन दिला होता. त्याच्यावर हत्या आणि अपहरणासमवेत ४० पेक्षा जास्त खटले आहेत. १९८६ मध्ये पहिल्यांदा त्याच्यावर गुन्हेगारी खटला दाखल झाला होता.

कोणत्या प्रकरणात मिळाला जामीन
- शहाबुद्दीन नोव्हेंबर 2005 पासून तुरुंगात होता. त्याला सीवान अॅसिड कांडात जामीन मिळाला आहे.
- 16 ऑगस्ट 2004 रोजी सीवान येथील व्यापारी चंद्रकेश्वर प्रसाद यांच्या तीन मुलांचे - सतीश, गिरीश आणि राजीव यांचे अपहरण झाले होते.
- सतीश आणि गिरीशला अॅसिडमध्ये बुडवून मारण्यात आले होते. यावेळी त्यांचा मोठा भाऊ राजीव पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
- राजीव हा अॅसिड कांडाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्यानेच खुलासा केला होता की शहाबुद्दीनही तिथे उपस्थित होता.
- हायकोर्टाच्या आदेशानुसार शहाबुद्दीनविरोधात सुनावणी सुरु झाली, दरम्यान, 16 जून 2004 रोजी महत्त्वाचा साक्षीदार राजीवची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. यात शहाबुद्दीन आणि त्याचा मुलगा ओसामा आरोपी आहे.

सीवान कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा, हायकोर्टातून जामीन
- सीवान कोर्टाने या प्रकरणात शहाबुद्दीलना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
- शहाबुद्दीनने या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज केले.
- बचाव पक्षाने म्हटले की शहाबुद्दीनवर हत्येचा थेट आरोप नाही. जेव्हा राजीव रोशनची हत्या झाली तेव्हा माजी खासदार शहाबुद्दीन तुरुंगात होता. त्याच्यावर हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे.
- त्यानंतर हायकोर्टाने जामीन मंजूर केला.
पुढील स्लाइडमध्ये,
> इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या कोण आहे शहाबुद्दीन..
> शहाबुद्दीनचे समर्थकांनी कसे केले स्वागत..
बातम्या आणखी आहेत...