आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
२३ मार्च १९३१. याच दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिवीरांना इंग्रज सरकारने फासावर लटकवले होते. या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. भगतसिंग आणि त्यांचे सहकारी हसत-हसत फासावर गेले होते. त्यांच्या मरणाचे दुःख नव्हते, उलट गर्व होता की देशभुमीसाठी आम्हाला काही तरी करता आले. इन्कलाब जिंदाबाद... चे नारे देत स्वातंत्र्यांचे स्वप्न पाहत ते फासाच्या तख्तावर गेले.
फासावर जाण्यापूर्वी भगतसिंगांनी जेलच्या काळकोठडीतून आपल्या सहका-यांना पत्र लिहिले होते. 'देश आणि मानवतेसाठी माझ्या मनात जे काही होते त्याचा हजारावा हिस्सा देखील मी पूर्ण करू शकलेलो नाही. जर, आणखी थोडं आयुष्य मिळाले असेत तर, नक्कीच त्या ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता. याशिवाय जगण्याचा कोणताच मोह माझ्या मनात नाही. माझ्या पेक्षा जास्त नशिबवान कोण असू शकतो ? आज मला स्वतःचाच अभिमान वाटत आहे. आता मोठ्या अधिरतेने शेवटच्या परीक्षेची वाट पाहत आहे. ' तरुणांमध्ये त्यांची 'जेल डायरी' आजही मोठ्या उत्साहाने वाचली जाते.
देशातील लहान लहान मुलांनाही भगतसिंग माहित आहे. जगातील महान क्रांतिकारकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाणे घेतले जाते. युवकांचे तर ते, आदर्श आहेत. लहानपणापासूनच त्यांना इंग्रजांच्या राजवटीची चीड होती. जगातही क्रांतीचा आदर्श म्हणून भगतसिंगांकडे पाहिले जाते. मात्र, लाहोरमध्ये शहीद झालेल्या भगतसिंगांविषयी पाकिस्तानला जराही आत्मियता नाही.
क्रांतीकारी म्हणजे काही दैवी अवतार आहेत असा आपल्याकडचा सर्वसाधारण समज आहे. मात्र ती देखील आपल्यासारखीच हाडा-मांसाची माणसे होती. त्यांनाह भाव-भावना होत्या. आज divyamarathi.com भगतसिंग आणि त्यांच्या सहका-यांचे रोजचे जीवन कसे होते, याबद्दलची माहिती आपल्या वाचकांना करून देत आहे.
सर्व छायाचित्रे मुक्ति मार्ग ब्लॉगवरून साभार.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.