आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahi Imam Of Jama Masjid Severs Ties With Samajwadi Party

शाही इमामांचा समाजवादी पार्टीला ‘खुदा हाफीज’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी अखेर समाजवादी पार्टीशी संबंध तोडले. जावयाला आमदारीकाचा राजीनामा देण्याचे निर्देश देऊन इतर समर्थकांना उत्तर प्रदेशातील सर्व सरकारी पदे सोडण्याचे फर्मान इमाम यांनी सोडले आहेत.

इमाम यांचे जावई उमर अली खान हे विधान परिषदेचे सदस्य होते.तर नागरी संरक्षण परिषदेचे वसीम अहमद यांनीही आपले राजीनामे सपाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्याकडे धाडले आहेत. उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारची नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे.त्यापार्श्वभूमीवर शाही इमाम यांच्या अचानक निर्णयाने उत्तर प्रदेशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात छेडले असता इमाम यांनी अखिलेश सरकारबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. वर्षभराच्या कार्यकाळात सपा सरकारने मुस्लिमांसाठी काहीही केलेले नाही. विधानसभा निवडणूकीपूर्वी मुस्लिमांना 18 टक्के आरक्षण दिले जाईल असे आश्वासन मुलायम यांनी दिले होते, परंतु मागण्या सोडाच मुस्लिमांचे मूळ हक्क अबाधित ठेवण्यातही सरकार अपयशी ठरले असा आरोप त्यांनी केला.