आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरी हल्ला: शहीद पित्याला तीन मुलींनी अशी दिली श्रद्धांजली, अश्रू पुसून गेल्या परीक्षेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परीक्षा देण्यासाठी शाळेत आलेली सुनीलकुमार यांची मुलगी अंशीका. - Divya Marathi
परीक्षा देण्यासाठी शाळेत आलेली सुनीलकुमार यांची मुलगी अंशीका.
गया (बिहार) - जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सुनीलकुमार विद्यार्थी यांच्या मुलींनी धैर्याचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे. घराचा कर्ता पुरुष, त्या मुलींचे वडील गेल्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध थांबता थांबत नव्हता. मात्र अभ्यास आणि शाळाही तेवढीच महत्त्वाची होती. घरात शोकाकूल वातावरण असताना शहीद जवानाच्या या मुली परीक्षेसाठी सोमवारी शाळेत गेल्या.
मुख्याध्यापकांनाही बसला धक्का
- शहीद सुनील यांच्या तिन्ही मुली - आरती, अंशु आणि अंशिका सोमवारी डीएव्ही मेडिकल स्कूलमध्ये परीक्षेसाठी गेल्या. या मुलींना पाहून मुख्याध्यापक आशिषकुमार यांनाही धक्का बसला. ते तिघींजवळ गेले त्यांची विचारपूस केली आणि त्यांचे सांत्वन केले.
- शाळा प्रशासनाने सोमवारी शाळेत आलेल्या मुलींना परीक्षेला बसू दिले. मात्र त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग पाहून पुढील परीक्षेला गैरहजर राहाण्याची सुट त्यांना दिली आहे. या तिघी बहिणींसाठी वेगळी परीक्षा घेण्याचे शाळेने ठरविले आहे.

दसऱ्याला सुटीवर घरी येणार होते सुनील
- सुनील विद्यार्थी हे बोकनारी येथे राहात होते. त्यांच्या वीरमरणाच्या वृत्तानंतर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांनी 1998 मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला होता.
- शहीदाच्या पत्नीने सांगितले, दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यासोबत बोलणे झाले होते. ते म्हणाले होते, की दसऱ्याची सुटी मंजूर झाली आहे.
- तीन महिन्यांपूर्वीच त्यांची जम्मू मध्ये पोस्टींग झाली होती. सुनील यांना तीन मुली आणि 2 वर्षांचा एक मुलगा आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुनील यांच्यासह त्यांच्या धैर्यशील मुली...
बातम्या आणखी आहेत...