आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात शहिदाच्या मुलीचे आज लग्न, शिक्षण संस्था सजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमाननगर- राजस्थानात भिलवाडा जिल्ह्यातील अमरवासी गावात २३ नोव्हेंबर रोजी होत असलेला विवाह सोहळा आगळा वेगळा आहे. येथील एका शिक्षण संस्थेत मुलीला हळद लागणार आहे. याच संस्थेत तिचे शिक्षण झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर तिने स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू केली आहे. याच वेळी तिला सरकारी नोकरी मिळाली. आता संस्था तिची पिता म्हणून अंजू नावाच्या नववधूची पाठवणी करणार आहे. लग्नाची तयारी अंजूच्या पालकांनी नव्हे तर महाविद्यालयाचे कर्मचारी व १९ शहिद कुटुंबांकडून सुरू झाली हाेती. अमरवासी येथील राजीव गांधी विद्यापीठ शिक्षण संस्था या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी सजून सज्ज झाली आहे. पाहुणे मंडळी येण्यास सुरुवात झाली आहे . 


२३ नोव्हेंबर रोजी सायंंकाळी वराकडील मंडळी गाडोली गावातून येथे येतील . नवरदेव संगमकुमार हा लष्करी जवान आहे, हे विशेष. संस्थेचे संचालक कुलदीप कुलहरी यांनी अंजूला दत्तक घेतले होते.


शहिदांचे कुटुंबीय सहभागी होणार
लग्नासाठी जिल्हा सैनिक बोर्डाकडून शहिदांची यादी घेण्यात आली. जिल्ह्यातील १६ व चितोडगड येथील  ३ शहिद कुटुंबांना खास आमंत्रणे गेली आहेत. निमंत्रण पत्रिकेत अंजूचा उल्लेख “शहिद सैनिकांची मुलगी’ अशा ठळक शब्दात करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...