आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahjahanpur Bar Girl Dancer Constable Showers Notes Dancing

VIDEO: मद्यधुंद पोलिसाने पिस्तुलाच्या धाकावर तरुणीला नाचवले, नोटाही उधळल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओमध्ये डान्सर तरुणवर रुपये उधळताना पोलिस कॉन्स्टेबल)
शाहजहांपूर- उत्तर प्रदेशात 'खाकी' पुन्हा एकदा डागाळल्याची घटना घडली आहे. एका मद्यधुंद पोलिस कॉन्स्टेबलने एका सार्वजनिक कार्यक्रमात बंदुकीची भीती दाखवून एका डान्सर तरुणीला जबरदस्तीने डान्स करण्यास प्रवृत्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर मद्यधुंद पोलिसाने तिच्यासोबत ठुमके लावत तिच्यावर रुपयांची उधळणही केली.

पोलिसांचा ड्रामा तब्बल एक तास सुरुच होता. त्यामुळे डान्सर तरुणीला कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांचा हिरमोड झाला. याघटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पोलिस कॉन्स्टेबलला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
शाहजहांपूरमधील निगोही येथे सोमवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. शैलेंद्र शुक्‍ला असे पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून तो कार्यक्रमस्थळी मद्यधुंद अवस्थेत पोहोचला होता. कार्यक्रम सुरु असताना कॉन्स्टेबल शैलेंद्र शुक्ला आयोजकांना धमकावत स्टेजवर चढला. पिस्तुल काढले त्यात काडतूसे लोड केली आणि डान्सर तरुणीवर ताणले. कॉन्स्टेबलचा अवतार पाहून डान्सर तरुणी आणि उपस्थित लोक घाबरले. अखेर कॉन्स्टेबलने पिस्तुलाची भीती दाखवत डान्सरला डान्स करण्यास सांगितले. भेदरलेली डान्सर कॉन्स्टेबलसमोर तब्बल एक तास नाचत राहिली. तसेच मद्यधुंद कॉन्स्टेबलने देखील तिच्यासोबत ठुमके लावत तिच्यावर रुपये उधळत होता. त्याच्या हातातील नोटांचे बंडल संपल्यानंतर तो स्टेजखाली उतरला.

निगोही पोलिस ठाण्यातील पोलिस आले आणि पोलिस कॉन्स्टेबल शैलेंद्र शुक्ला याला घेवून गेले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, मद्यधुंद पोलिस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ आणि फोटो...