आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या ताटात King खानने अशी खाल्ली दाल-बाटी, कटोरी-ग्लासही होते Goldचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोन्याच्या थाळीत दाल-बाटी आणि चुरमा खाताना शाहरुख. - Divya Marathi
सोन्याच्या थाळीत दाल-बाटी आणि चुरमा खाताना शाहरुख.
जयपूर - शाहरुख खान सध्या आपला आगामी सिनेमा 'जब हॅरी मेट सेजल'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याने दोन दिवसांपर्यंत या चित्रपटाचे प्रमोशन राजस्थानात केले. शनिवारी शाहरुख जयपूरमध्ये होता आणि त्याने येथे पहिल्यांदा सोन्याच्या भांड्यांमध्ये प्रसिद्ध दाल-बाटी आणि चुरमाचा आस्वाद घेतला.
 
14 वाट्यांमध्ये सर्व्ह केली राजस्थानी व्यंजने...
- शनिवारी आपल्या आगामी सिनेमा 'जब हॅरी मेट सेजल'च्या प्रमोशनाच्या निमित्ताने किंग खान जयपूर शहरात आला होता. त्याने तेथे एका फेमस राजस्थानी फूड रेस्टॉरेंटमध्ये पहिल्यांदा सोन्याच्या ताटात दाल-बाटी आणि चुरमा खाल्ला.
- शाहरुख खानला 14 वाट्यांमध्ये राजस्थानी व्यंजने सर्व्ह करण्यात आली होती. शाहरुखने दोन बट्ट्या खाल्ल्या. यासोबतच जोधपुरी गट्ट्याची भाजी, कैर सांगरी, कढी, घेवर, मालपुवा, केसरची खीर, बेसणाचा चुरमा, प्लेन चुरमा आणि राजस्थानी पापडही शाहरुखला सर्व्ह करण्यात आले होते.
- रेस्टॉरेंटचे संचालक मनीष शर्मांना शाहरुखने सांगितले की, त्याने पहिल्यांदा राजस्थानचा दाल-बाटी आणि चुरमा खाल्ला आणि तो खूप टेस्टीही लागला.
 
जेवणाआधी क्लिक केले राजस्थानी स्टाइलमध्ये फोटोज...
शाहरुख खाने राजस्थानी फूड रेस्टॉरेंटवर लंच करण्याआधी राजस्थानी स्टाइलमध्ये पिवळ्या रंगाचा साफा परिधान करून फोटो क्लिक केले.
- शाहरुखने यादरम्यान आपल्या हातात तलवारही पकडलेली होती आणि राजसी अंदाजात फोटो काढले.
 
सोन्याचे भांडे होते खास
- शाहरुखला सोन्याच्या ताट-वाटीत राजस्थानी पक्वान्न वाढण्यात आले होते. ज्या ग्लासाने तो पाणी प्यायला तोही सोन्याचाच होता.
- ज्या चौरंगावर जेवण वाढले तो चांदीचा होता. रेस्टॉरेंटचे मनीष शर्मा म्हणाले की, शाहरुखला खास 'महाराजा थाळी' सर्व्ह करण्यात आली होती.
 
10 हजारांची एक थाळी
- शाहरुखला जी महाराजा थाळी सर्व्ह करण्यात आली होती, त्याची किंमत 10 हजार रुपये आहे. या थाळीची खासियतच आहे की यात सोन्या-चांदीच्या भांड्यांत जेवण वाढले जाते.
फोटोज - मनोज श्रेष्ठ
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...