मेरठ/शामली - यूपीच्या शामली जिल्ह्यात हिंसाचार प्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार नाहीद हसन आणि नगर परिषदेचे माजी अध्यक्ष हाजी इकबाल यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. हिंसाचारासाठी चिथावणी देणे आणि सार्वजिनक मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
शामलीच्या कांधला रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दिल्ली-कांधला दरम्यान धावणाऱ्या एका रेल्वेत काही मुस्लिम धर्मगुरूंना मारहाण झाली होती. त्यानंतर शनिवारी भडकलेल्या गर्दीने काही रेल्वे अढवल्या. तसेच प्रवाशांना मारहाणही केली होती. त्यांनी पोलिस ठाण्यावरही हल्ला केला, तसेच काही गाड्यांचीही जाळपोळ केली. पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच लाठीचार्जही करावा लागला. यात अनेकजण जखमी झाले.
महत्त्वाचे अधिकारी घटनास्थळी
शनिवार रात्री उशीला पोलिस महासंचालक आलोक शर्मा, आयुक्त तंवीर जफर अली आणि इतर अधिका-यांनी कांधलाचा दौरा केला तसेच शांतता राखण्याचे आव्हानही केले. अजूनही याठिकाणी काहीसे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज