आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॐ ऐवजी \'अल्लाह हू\' संबोधतात हे योगगुरू; पत्नीही शिकवते योगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - पाकिस्तानमध्ये योगचा प्रसार-प्रचार करणारे योगगुरु शमशाद हैदर यांनी मागील वर्षी 21 जूनला शेकडो शिष्यांसोबत लाहोरमध्ये जागतिक योग दिन साजरा केला होता. भारताने जगाला योगशास्त्राचा अमुल्य ठेवा दिला आहे. तेव्हा पाकिस्तान हा देखील भारताचाच भाग होता, असे हैदर यांनी यांनी सांगितले होते. योगाचे गुरू पतंजलि यांचा जन्म मुल्तान येथे झाला होता. आता हा भाग पाकिस्तानमध्ये आहे.

भारतातही अनेक मुस्लिम संघटना देखील या कार्यक्रमात भाग घेणार असून त्यांना ॐ ओम ऐवजी 'अल्लाह हू'चा उच्चार करायला सांगितले आहे? या प्रश्नाला उत्तर देताना हैदर म्हणाले की, ही एक चांगली गोष्ट आहे. मंत्रोपचार करण्यास काहीच हरकत नाही. मंत्राचा स्वतःचा प्रभाव असतो आणि यामुळे माणसाला शक्ती मिळते. ही चांगली गोष्ट आहे की, ज्या लोकांना मंत्र म्हणायचा नाही त्यांनी अल्लाहचे नाव घ्यावे. अनेक शिष्य योगाभ्यासादरम्यान ‘अल्लाह हू, अल्लाह हू’चा उच्चार सूफी परंपरेनुसार करतात, असेही हैदर यांनी सांगितले आहे.

पत्नी शुमायलाही शिकवतात योगा
योगगुरु हैदर यांची पत्नी शुमायला या देखील योगाटीचर आहे. शमशाद सांगतात की, सुरूवातीला शुमायला दम्याचा आजार होता. या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी तिने योगाभ्यास सुरु केला. योगामुळे शुमायलाचा आजार बरा झाला. योगला एखाद्या विशिष्ट धर्माशी बांधून ठेवणे योग्य नाही. ही एक अशी जीवन पद्धती आहे की, ज्यामुळे आरोग्य चांगले आणि वय वाढत असते, असे शुमायला सांगतात. सुरुवातीला पाकिस्तानात योगाभ्यासला विरोध झाला, मात्र आता हळूहळू लोकांनी याचा स्वीकार केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, योगाभ्यासादरम्यान योगगुरु शमशाद हैदर व त्यांच्या पत्नीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)