आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ओम ऐवजी अल्लाह हू, अल्लाह ह बोलतात हे योगगुरू

PHOTO: \'ओम\' ऐवजी \'अल्लाह हू, अल्लाह हू\' म्हणतात हे योगगुरू, पाकिस्तानात साजरा करणार योग दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - पाकिस्तानमध्ये योगचा प्रसार-प्रचार करणारे योगी शमशाद हैदर यांनी सांगितले की, 21 जूनला ते त्यांच्या शेकडो शिष्यांसोबत लाहोरमध्ये जागतिक योगा दिवस साजरा करणार आहेत. हैदर यांनी फोनवरून माहिती देत सांगितले की, भारताने जगाला योगाचे भेट तेव्हापासून दिली आहे, जेव्हा पाकिस्तान भारताचाच एक भाग होता. योगाचे गुरू पतंजलि यांचा जन्म मुल्तान येथे झाला असून आता हा भाग पाकिस्तानमध्ये आहे.

जेव्हा त्यांना सांगण्यात आले की, भारतातही अनेक मुस्लीम संघटना या योग दिवसात भाग घेणार आहेत, तसेच त्यांना सुरूवातीला ओम ऐवजी अल्लाहचा उच्चार करायला सांगितले आहे तेव्हा हैदर म्हणाले की, ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र मंत्राचे उच्चारण करण्यास काहीच हरकत नाही. मंत्राचा स्वतःचा प्रभाव असतो आणि यामुळे माणसाला शक्ती मिळते. ही चांगली गोष्ट आहे की, ज्या लोकांना मंत्र म्हणायचा नाही त्यांनी अल्लाहचे नाव घ्यावे. त्यांनी सांगितले की, त्यांचे अनेक शिष्य योगाच्या आसना दरम्यान ‘अल्लाह हू, अल्लाह हू’ चा उच्चार सूफी परंपरेनुसार करतात.

पत्नी शुमायलासुध्दा शिकवतात योग
योगी हैदर यांची पत्नी शुमायलासुध्दा योग शिकवतात. शमशाद सांगतात की, सुरूवातीला शुमायला दम्याची रुग्ण होती. या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी तिने योगच्या सेशनमध्ये भाग घेतला. योगामुळे शुमायलाचा आजार ठिक झाला. दोन वर्षापूर्वी त्यांनी योगी हैदरसोबत लग्न केले. शुमायला असे मानतात की, योगला एखाद्या विशिष्ट धर्माशी बांधून ठेवणे योग्य नाही. ही एक अशी जीवन पध्दती आहे ज्यामुळे आरोग्य चांगले आणि वय वाढते. यामुळेच पाकिस्तानमध्येही सुरूवातीला योगाला विरोध झाला, मात्र आता हळू हळू लोक याचा स्विकार करत आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, योगा शिकवताना योगी शमशाद हैदर यांचे फोटो.. .