आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पद्धतीने YOG शिकतोय पाकिस्तान, ओंकाराने होतो दिवस सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमशाद हैदर आणि त्यांच्या पत्नी शुमाइला. - Divya Marathi
शमशाद हैदर आणि त्यांच्या पत्नी शुमाइला.
अमृतसर - लाहोरचे शमशाद हैदर सध्या पाकिस्तानी लष्कराला योगा शिकवत आहेत. लष्कराबरोबरच क्लब, रुग्णालये आणि शिबिरांद्वारे त्यांनी हजारो सामान्य लोकांनाही प्रशिक्षण दिले आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते अशा प्रकारे प्रशिक्षण देत आहेत. पत्नी शुमाइला आणि सुमारे 68 शिष्य त्यांची मदत करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात आता शमशाद यांना ‘योगी’ म्हटले जाऊ लागले आहे. मी भारतीय पद्धतीनेच योगा शिकवतो आणि आमच्या दिवसाची सुरुवात ओंकाराने होते, असे शमशाद सांगतात.

शमशाद यांनी योगी कसे झाले याची कथा उलगडून सांगितली. ते म्हणाले, आधी मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचो नेहमी बेचैन असायचो. काहीतरी शोधतो आहे असे वाटायचे. त्याच शोधात भारतात आलो. ही 15-16 वर्षांपूर्वीची बाब आहे. मी काही काळ हरिद्वारमध्ये घालवला. नंतर फिरत फिरत महाराष्ट्रातील इगतपुरीमध्ये पोहोचलो. येथे सत्यनारायण गोयंका विपश्यना मेडिटेशन शिकवतात हे ऐकले होते. मीही तेथे जायला सुरुवात केली. तेव्हाच आपण ज्या शोधात आहोत ते पूर्ण होणार याची जाणीव झाली. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर जेव्हा लाहोरला परतलो तेव्हा शांत आणि समाधानी बनलो होतो. आता हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. मी 2004 पासून सुरुवात केली. आधी काही लोकांनी नकार दिला. पण योगाने आजारांपासूनही सुटका होते, हे लक्षात आल्यानंतर सर्व शांत झाले. त्यानंतर सर्व आपोआप घडत गेले.

आेंकाराबरोबर उजाडते पहाट
शमशाद सांगतात की, मी पूर्णपणे भारतीय पद्धतीने योगा शिकवतो. आमची प्रत्येक पहाट ओकांराच्या गजराने उगवते. त्यानंतर सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि योगासने सुरू होतात. या सर्वांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवायला लागतो. शुमाइला म्हणजे शमशाद यांच्या पत्नींनी आपल्याला तसा अनुभव आल्याचे सांगतात. सुरुवातीला माझ्यावर भरपूर पैसा कमावण्याचे बूत होते, पण योगामुळे माझ्या जीवनातील लालूच कमी झाली आणि मी समाधानी बनले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO'S