नवादा- बिहारमध्ये खनवा गावातील सरपंचपद हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव झाले होते. आजूबाजूच्या गावातील आठ उमेदवार मैदानात उतरून त्यासाठी जोरदार दावा करत होते. खनवा ग्रामस्थांना त्यांच्या गावचे प्रतिनिधित्व करेल असा उमेदवार िमळत नव्हता.
त्याच वेळी गावातील पदवीपर्यंत शिकलेला एकमेव तरुण शंकर सुटीसाठी म्हणून गावी आला होता. तो मनमिळाऊ असल्याने गावातील लोकांचा ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय होता. सर्वांनी मिळून त्याला निवडणूक लढवण्यासाठी राजी केले. आज तो त्या गावातील ग्रामपंचायतीचा सरपंच बनला आहे. शंकरने मात्र त्याच्या निवडीचे श्रेय ग्रामस्थांना िदले असून ग्रामपंचायतीचा प्रत्येक मतदार, नागरिक सरपंच आहे. आज मी जो काही आहे तो गावातील ज्येष्ठांचा आशीर्वाद असल्याचे तो सांगतो.
शंकरचे वडील लाँड्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या समाजात इतके कुणीच शिकलेले नाही तरीही त्यांनी कष्ट करून शंकरला शिकवले. तो पहिल्यापासूनच अभ्यासासाठी परिश्रम घेत असे. वसतिगृहात राहून त्याने शिक्षण घेतले. पदवीधर झाल्यानंतरही योग्य नोकरी िमळाली नाही तेव्हा त्याने हरिद्वार येथे एका रस्ते तयार करणाऱ्या खासगी बांधकाम कंपनीत मासिक १४ हजार रुपये पगारावर मुकादमाची नोकरी स्वीकारली. त्या नोकरीत त्याचे मनही रमले होते. पण ग्रामस्थांनी जेव्हा सरपंच होण्यासाठी गळ घातली तेव्हा मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. गावाचा विकास हाच एकमेव उद्देश असल्याचे शंकरने सांगितले.
आदर्शगाव बनले खनवानवादाजिल्ह्यातील नरहट तालुक्यातील खनवा हे बिहारचे पहिले मुख्यमंत्री डॉ. श्रीकृष्ण सिंह यांचे जन्मगाव आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत या गावाची निवड केली आहे. त्याच्या विकासासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दीड कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा केली आहे.
दहा हजार रुपयांत लढवली िनवडणूक
आजूबाजूच्या गावांतील सदस्य सरपंच होण्यासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार होते. इतर गावांत सरपंच होण्यासाठी इच्छुक लोकांना दारू पाजतात, पैसे खर्च करतात; परंतु शंकरने असे काही केले नाही. उमेदवारी अर्ज भरण्यापासून विजयी होईपर्यंत त्याचा खर्च दहा हजार रुपयांच्या पुढे गेला नाही. एक रुपयादेखील वायफळ खर्च केला नाही, असे तो सांगतो.