आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसी निष्ठेचा अतिरेक; सिकंदराबादचे आमदार बांधणार सोनिया गांधी यांचे भव्य मंदिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- वेगळ्या तेलंगणा राज्याला मंजुरी दिल्याने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे भव्य मंदिर बांधणार असल्याचे सिकंदराबादचे आमदार आणि माजी मंत्री पी. शंकर राव यांनी सांगितले आहे.
कॉंग्रेस विधानसभा सदस्य कार्यालयात वार्ताहरांशी बोलताना पी. शंकर राव म्हणाले, की सोनिया गांधी यांनी वेगळ्या तेलंगणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे आहे. त्यांचे माझ्या मतदारसंघात मंदिर बांधून आभार व्यक्त करण्याची कल्पना मला सुचली. यात काही वावगे नाही. सोनिया गांधी यांच्या जन्मदिनी या मंदिराचे माझ्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
पी. शंकर राव म्हणाले, की सोनिया गांधी यांच्या भूमिकेमुळे वेगळे तेलंगणा राज्य अस्तित्वात आले आहे. तेलंगणाच्या प्रत्येक मतदारसंघात त्यांची मंदिरे बांधायला हवीत.
तेलंगणा राज्याला विरोध करणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांच्याबाबत काय म्हणाले शंकर राव, वाचा पुढील स्लाईडवर