आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकराचार्य म्हणाले, पूजा करून महिलांचे भले होणार नाही, शनी देव नाही ग्रह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणशी- शनी शिंगणापूर येथे शनी दर्शनाच्या वादावर सर्व धर्मगुरूंचा महिलांना पाठिंबा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र त्याला विरोध केला आहे.
ते म्हणाले, पूजा करून महिलांचे भले होणार नाही. कारण, शनी ग्रह आहे, देव नव्हे. शनीची पूजा त्याच्या कोपातून मुक्त होण्यासाठी केली जाते. परंपरा तोडण्यासाठी सामाजिक न्यायाचा आधार घेणे योग्य नाही. प्रकरणात सरकारचे काही घेणे-देणे नाही. कारण ते या दोघांच्या मध्ये आहे.