आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shankaracharya Said Muslim Eat Beef Vanish Hindu Identity

गोमांस खाणारे स्वतःला हिंदू म्हणू लागले तर आपली ओळख मिटेल - शंकराचार्य स्वरुपानंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी मुस्लिमांच्या 'घरवापसी'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, गोमांस खाणारे मुस्लिम जर स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ लागले तर आपण स्वतःला काय म्हणाचये? सरस्वती यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांनी मुस्लिमांना हिंदू करण्याचे काम सुरु केले आहे. असे झाले तर हिंदूंची ओळख पुसली जाईल. ज्या लोकांना या धर्माबद्दल कोणतीच आस्था नाही अशांना धर्मात प्रवेश दिला तर आपली ओळख काय राहील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिर्डीच्या साईबाबांबद्दल पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वाराणसी येथील विद्यामठ येथे त्यांच्या हस्ते सनातनी पंचांगाचे प्रकाशन करण्यात आले.
स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, 'ज्यांना हिंदू धर्माबद्दल आपलेपणा वाटतो, ज्यांची या धर्मावर श्रद्धा आहे आणि काही कारणामुळे ते या धर्मापासून दूर गेले त्यांची 'घरवापसी' समजू शकतो. ज्यांनी आर्थिक लाभ, गरीबी आणि बलात्कारामुळे धर्म परिवर्तन केले आहे, त्यांची घरवापसी होऊ शकते.'

शिर्डी संस्थानावर पुन्हा आगपाखड
स्वरुपानंद यांनी शिर्डीच्या साई बाबा संस्थानावर पुन्हा एकदा आगपाखड केली आहे. ते म्हणाले, रमेश जोशी या व्यक्तीने आरटीआयमध्ये संस्थानच्या संपत्तीची माहिती मागितली होती. त्यात संस्थानकडे 13 अब्ज रुपये विविध बँकांमध्ये असल्याचे समोर आले आहे. ही सर्व संपत्ती हिंदूंना वेडे बनवून जमा करण्यात आली आहे. शंकराचार्यांनी साईबाबांवर टिप्पणी करताना म्हटले आहे, की त्यांनी हिंदू देवतांचा मुखवटा चढविला आहे.

साईबाबा असल्याचे कोणतेही प्रमाण नाही
स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, की साई ट्रस्ट शताब्दी समारोह साजरा करणार आहे. यात 1200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या समारोहातून हिंदूंच्या मनात भ्रम निर्माण केला जाईल. त्याऐवजी हा पैसा योग्य ठिकाणी सतकारणी लागला पाहिजे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी या पैशांचा विनियोग झाला पाहिजे. साईबाबांबद्दल स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, की साईबाबा होते याचे कोणतेच पुरावे नाहीत. साईच्या चरित्रांविषयी संस्थानकडेही ठोस माहिती नाही. साईबाबाला सर्व शक्तीमान आणि महानायक म्हटले जाते, मात्र त्याला कोणताच आधार नाही. हिंदूंच्या मनात असलेला भ्रम दूर करण्याची गरज आहे.

पुढील स्लाइडमध्ये, पंचांगाचे प्रकाशन करताना शंकराचार्य