आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shankaracharya Swami Swaropanand Saraswati Said Shridi Sai Baba Is Not God

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईबाबा हे देव नाहीत, शंकराचार्य स्‍वामी स्‍वरूपानंद सरस्‍वती यांचे वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंकराचार्य स्‍वामी स्‍वरूपानंद सरस्‍वती यांनी शिर्डीच्या साईबाबांना हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानण्यास नकार दिला आहे. तसे असते तर मुस्लीमांनीही साईबाबांना मानले असते. पण त्यांना केवळ हिंदुच मानतात. त्यामुळे त्यांना हिंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असल्याचे सांगून चुकीचा प्रचार केला जात असल्याचे शंकराचार्य म्हणाले. तसेच शिर्डीचे साईबाबा हे देव नसल्याचेही सरस्‍वती म्हणाले. त्यामुळे साईबाबांची पुजा करणे हे चुकीचे असल्याचेही सरस्वती म्हणाले. तसेच साईबाबांच्या नावावर पैसा उकळला जात असल्याचेही शंकराचार्य म्हणाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'हर हर मोदी, घर घर मोदी' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली होती. या घोषणांचाही स्‍वामी स्‍वरूपानंद शंकराचार्यांनी समाचार घेतला होता. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही शंकराचार्यांनी चर्चा केली होती. स्‍वरुपानंद भागवतला म्हणाले होते की, 'घोषणा तर 'हर हर महादेव' अशी असते. मग आता श्री शंकरांच्या जागी मोदींचटा फोटो लागणार का? की मोदींना देवाच्या जागी बसवणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती. त्यानंतर नरेंद्र मोदींनीही समर्थकांना ही घोषणा वापरू नये अशी सूचना केली होती.
फाइल फोटो - माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह शंकराचार्य स्‍वामी स्‍वरूपानंद सरस्‍वती