(फोटो: शंकाराचार्य स्वरूपानंद सरस्वती)
अलाहाबाद- द्वारका आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी देशात समान नागरी कायदा (कॉमन सिव्हिल कोड) लागू करण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'हिंदुंनी चार अपत्त्ये जन्माला घातली तर मुसलमान चाळीस घालतील. कारण मुसलमान व्यक्तीला एका पेक्षा जास्त बायका करण्याचा अधिकार आहे. परंतु, हिंदु व्यक्तीला फक्त एक विवाह करता येतो. यामुळे संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, अशी अपेक्षा शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी व्यक्त केली आहे. शंकराचार्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात संबोधित केले.
अलाहाबाद येथील मनकामेश्वर मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात शंकाराचार्य म्हणाले की, 'महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीमुळे मुसलमान स्वस्त प्रोटीनपासून वंचित झाले आहेत. परंतु मुसलमान लोकांना हे माहीत नाही की, गायीच्या दूधातही मोठ्याप्रमाणात प्रोटीन असतात. मुसलमानांनी गायींचे संगोपन करून त्याचे दूध प्यावे, त्यातूनही जास्त प्रोटीन मिळते. याला कोणाचाही विरोध नसेल.
शंकराचार्यांनी गोवंश हत्या बंदीप्रकरणी सरकारवरही कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, गायी कापण्याच्या मशीन विदेशातून येतात. विशेष म्हणजे
आपले केंद्र सरकार त्यावर अनुदान (सबसिडी) देत आहे.
ताजमहलाखाली शिवलिंग
'आग्रा येथे ज्या जागेवर ताजमहल आहे त्या जागेवर प्राचिन काळात शिवमंदिर होते. मुमताज यांच्या क्रब खाली शिवलिंग आहे. अग्रेश्वर महादेव या नावाने ही हे मंदिर प्राचिन काळात ओळखले जात होते, असा दावा देखील शंकाराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी यावेळी केला. बॉलीवूड अभिनेता
आमिर खानचा सिनेमा '
पीके'वरही त्यांनी टीका केली.
दरम्यान, भारतातील प्रत्येक हिंदू महिलेने कमीत कमी चार अपत्ते जन्माला घालावीत, असा अजब सल्ला उन्नाव येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दिला होता. मेरठमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संत सामगम महोत्सवात संबोधित करताना साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले. या मुद्द्यावरून अनेक दिवस संसदेचे कामकाज होऊ शकले नव्हते. आता पुन्हा शंकाराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय म्हणाले होते खासदार साक्षी महाराज...