आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: शंकराचार्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुलासह पोहोचले दिग्विजय सिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - द्वारका-शारदा ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती गुरुवारी सायंकाळी येथे पोहोचले. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळाहून ते बाणगंगा झरनेश्वर मंदिरातील अध्यात्म विद्या निकेतन येथे गेले. येथे भावीकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी खासदार कैलास जोशी, गृहमंत्री बाबुलाल गौर, माजी आमदार पीसी शर्मा, आमदार जयवर्धन सिंह असे अनेक बडे नेते पोहोचले होते.
राज-राजेश्वरी मंदिरात खास पुजा : बाणगंगा झरनेश्वर येथील राज-राजेश्वरी त्रिपूर सुंदरी देवी मंदिराच्या तिस-या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुक्रवार शंकराचार्यांच्या उपस्थितीत पाटोत्सव होणार आहे. महंत सुशीलानंद महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजता मंदिरात विशेष पुजा आरती आणि इतर धार्मिक विधी होतील.

कडक सुरक्षाव्यवस्था
साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रथमच भोपाळल्या आलेल्या शंकराचार्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी खास व्सवस्था केली होती. अनेक पोलिस कर्मचारी त्यांच्या आगमनापूर्वीच तैनात होते. शंकराचार्यांनीही यावेळी प्रथमच एकाचवेळी एवढ्या मोठ्या माध्यमांचे प्रतिनिधी भेटायला आल्याचे सांगितले.
फोटो - भोपाळमध्ये अध्यात्म विद्या निकेतनमध्ये शंकराचार्य स्वरूपानंद यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले दिग्विजय सिंह.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो...