आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shankaracharya Vasudevanand Controversial Statement

शंकराचार्य वासुदेवानंद यांचे वादग्रस्त वक्तव्य, हिंदूंना 10 मुले झाली पाहिजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलहाबाद - भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आल्यापासून हिंदू संघटना आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह त्यांच्या इतर संघटनांनी वादग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. हिंदूंनी जास्तीतजास्त मुले होऊ द्यावी अशी वक्तव्य गेल्या काही दिवसांत होत आहेत. याच मालिकेत आता शंकराचार्यांचाही समावेश झाला आहे. येथे सुरु असलेल्या 'धर्म संगम' संमेलनात शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वासुदेवानंद सरस्वती म्हणाले, 'हिंदू कुटुंबांनी दहा अपत्यांना जन्म दिला पाहिजे.'
याआधी विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी प्राची यांनी प्रत्येक हिंदू महिलेने चार मुलांना जन्म द्यावा असे आवाहन केले होते. यातील एक मुलगा देशसेवेसाठी लष्करात पाठवाव, दुसरा विहिंपला द्यावा, तिसरा साधूंना द्यावा आणि एक आपल्याकडे ठेवावा अशी त्यांच्या कार्याचीही विभागणी केली होती. यावरुन मोठे वादळ उठले होते. पहिले वादळ शमले नसतानाच शंकाराचार्यांनी या वादात उडी घेतली आहे.

धर्मांतराविरोधात कायदा नको - शंकराचार्य
धर्मांतराविरोधात कायदा नसला पाहिजे, असे सांगत शंकराचार्य म्हणाले, 'हिंदू धर्मातूनच शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा जन्म झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला पुन्हा आपल्या मुळ धर्मात परतण्याचा अधिकार आहे.'
प्रत्येक हिंदूंनी दहा मुले होऊ द्यावी, असे त्यांचे वक्तव्य आहे. भारतीय लोकसंख्या जगात पहिल्या क्रमांकाच्या दिशेने निघाली असताना हिंदू धर्माचे शंकराचार्य दहा मुलांना जन्म दिला पाहिजे असे म्हणत आहे. यावर केंद्र सरकारने अजून आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, त्यांनी ही वक्तव्ये चुकीची असल्याचेही म्हटलेले नाही.

खासदार साक्षी महाराजांना नोटीस
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील उन्‍नावचे खासदार साक्षी महाराज यांना भाजपने मंगळवारी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. हिंदू महिलांनी चार मुलांना जन्म देण्याचा वादग्रस्त सल्ला साक्षी महाराजांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्षअमित शहा यांच्या सूचनेवरून साक्षी महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला दहा दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसेंना देशभक्त म्हणून साक्षी महाराज यांनी मोठा वाद निर्माण केला होता. तसेच 'लव्ह जिहाद'साठी विदेशातून पैसा येतो, असेही त्यांनी म्हटले होते.
फोटो - भाजप खासदार साक्षी महाराज