शिर्डी - साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणा-या स्वामी स्वरुपानंद शंकराचार्यांना हे प्रकरण भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शंकराचार्यांच्या विरोधात शिर्डीमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावनांचा अपप्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकराचार्य वक्तव्यावर ठाम
शिर्डीच्या साईबाबांना मांसाहारी, लुटारू असल्याचे सांगत त्यांची पुजा म्हणजे हिंदुंना विभागण्याचे षड्यंत्र असल्याचे वक्तव्य करणारे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वीती यांचा सगळ्या स्तरातून विरोध होत आहे. तरीही ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी मंगळवारी आपले वक्तव्य योग्य असल्याचे सांगत पुन्हा साईबाबांवर टीका केली. 'सबका मालीक एक है, याचा अर्थ आधी मला सांगा. सर्व मनुष्यांचा मालक एक आहे. साईही मनुष्यांपैकी एक होते. मग त्यांचा मालक कोण होता, असा प्रश्न त्यांनी केला. सबका मालीक एक हे साईबाबांचे सूत्र वाक्य होते.
तज्ज्ञ स्वामींच्या विरोधात?
शंकराचार्यांच्या मते साईबाबा देवही नाहीत आणि गुरूही नाहीत. त्यांच्या मते गुरू तोच असतो जो सदाचारी असतो. पण साईबाबा मांसाहारी होते, ते लोकांच्या खतना करायचे, पंडारक समाजाचे होते. पण ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते हिन्दू धर्मात गुरु - शिष्य ही प्राचीन परंपरा आहे. गुरूकृपेशिवाय देवाचा आशीर्वादही मिळत नाही, असे मानले जाते. गुरू शब्दाचा अर्थ म्हणझे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असा होतो. गुरू कोणीही असू शकतो. गुरू मांसाहारीही असू शकतो, असे ते म्हणाले.
शंकराचार्य यांनी साईबाबाला अवतचार माननेही चुकीचे असल्याचे म्हटले आहे. शास्त्रांमध्ये कलयुगात बुद्ध आणि कल्कि यांच्याशिवाय कोणत्याच अवताराचा उल्लेख नाही. त्यामुळे साई अवतार अशू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
अवतार म्हणजे काय?
सनातन हिन्दु धर्मातील मान्यतांनुसार ईश्वराचे पृथ्वीवर अवतरणे (जन्म घेणे) यालाच अवतार म्हणतात. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ईश्वराचा वास असला तरी, वेळो वेळी देवाला पृथ्वीवर विशिष्ठ रुपात अवतार घ्यावा लागतो. जोपर्यंत त्यांच्या अवताराचा उद्देश पूर्ण होत नाही, तोवर ते पृथ्वीतलावर राहत असतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा - शंकराचार्यांबरोबरचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते आणि मजी मंत्री श्रीप्रकाश शुक्ल आणि दिग्विजय सिंह यांचे फाईल फोटो...