आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणाने उचलला ब्रॉकलेसनरला हरवण्याचा विडा; रोज 40 अंडे खाऊन बनवली अशी BODY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाधरी (हरियाणा) - महाबली खलीच्या अकॅडमीत राहतोय हरियाणाचा 27 वर्षांचा गुरुविंद्र ऊर्फ शँकी. WWE मध्ये महाबली खलीने याआधीच देशाचा नावलौकिक केला आहे. मागच्या महिन्यात अमेरिकेतून आलेल्या निमंत्रणावर शँकीने दुबईत पाच दिवसांची ट्रायल दिली. अमेरिकेला जाण्यासाठी आता फक्त शँकीच्या रिझल्टची प्रतीक्षा आहे.
 
WWEच्या तयारीसाठी वजनाहून जास्त प्रोटीन...
- शँकीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाहीये. त्याने जालंधरमध्ये खलीच्या अकॅडमीत डावपेचांचे प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.
- शँकी म्हणाला, WWEच्या तयारीसाठी वजनाहून जास्त डबल प्रोटीन घ्यावे लागते. एक अंड्यात 4 ग्रॅम प्रोटीन आणि 100 ग्रॅम चिकनमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असते. 7 फुटांचा शँकी 130 किलो वजनाचा आहे. त्या हिशेबाने त्याला दररोज 260 ग्रॅम प्रोटीनची गरज असते.
- प्रोटीनसाठी तो एका दिवसात 40 हून जास्त अंडे आणि 1 किलो चिकन, भात, चपाती असा आहार घेतो. 
- सध्या तो दोन डझन अंडे, दाळवं आणि दोन लिटर दूध हे फक्त नाष्ट्यात घेतो.  
- दुपारच्या जेवणात फुल चिकन, डाळ, एक मोठी प्लेट भात, चपाती आणि रात्रीच्या वेळी पुन्हा एक डझन अंडे, चिकन, भात, आणि वरण-चपाती असा आहार घेतोय. 
- त्याच्या या जेवणावर महिन्याकाठी 50 हजार रुपये खर्च होतात.
- शँकी म्हणतो, जर मला पूर्ण आहार मिळाला असता तर एक वर्षाआधीच मी अमेरिकेत WWE साठी गेलो असतो. वेळोवेळी काही दानशूरांनीही त्याला आर्थिक मदत केली आहे.
 
ब्रॉकलेसनरला हरवणार
- शँकी म्हणतो, अमेरिकेत पोहोचून WWEचा चॅम्पियन अमेरिकेचा ब्रॉकलेसनरला हरवून आपल्या देशाचा डंका वाजवणार आहे. 
- शँकीचे वडील खासगी नोकरी करतात. आई नरेंद्र कौर गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी आहेत. त्याचे कुटुंब किरायाच्या घरात राहते. त्याने बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. मित्रांनी सुचवल्यावरून त्याने 2015 मध्ये खलीच्या अकॅडमीत प्रवेश घेतला होता.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, शँकीचे आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...