आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवार, ठाकरे, अखिलेश, मायावती स्टार प्रचारक म्हणून सुरतला जाण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- गुजरात विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही सुरतमध्ये स्टार प्रचारकांची मदत घेणार आहेत. या सर्व राजकीय पक्षांनी  पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील ८९ जागांवरील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. या यादीनुसार, येत्या काळात सुरतसह दक्षिण गुजरातमध्ये भाजपतून लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि सुषमा स्वराजसारखे नेते येऊ शकतात. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, बसपातून मायावती, सपाचे अखिलेश यादव, आपचे गोपाल राय हे नेतेही येऊ शकतात. भाजपने ४०, काँग्रेसने ४०, शिवसेनेने २०, बसपाने ४०, सपाने २०, राष्ट्रवादीने २५ अाणि आपने आपल्या २० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली आहे.  


सुरतमधील १६ जागांचा विचार करता, आतापर्यंत भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, खासदार परेश रावल आणि मनसुख मांडविया हे सुरतला येऊन गेले आहेत. तसेच काँग्रेसचे राहुल गांधी, सॅम पित्रोदा, मधुसूदन मिस्त्री, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट, मनमोहन सिंग व गुलाम नबी आझाद यांनीही गुजरात दौरा केला आहे. 


शिवसेना, सपा-बसपाच्या नेत्यांचा पहिलाच दौरा 
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सपा, बसपा आणि आपसारख्या पक्षांनीही काही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बड्या नेत्यांचे लक्ष हिंदीभाषिक मतदारांवर असेल. 

बातम्या आणखी आहेत...