आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी परिधान केली लुंगी, केरळमध्ये साजरा केला ओणम, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार यांनी केरळमध्ये ओणम सण साजरा केला. - Divya Marathi
शरद पवार यांनी केरळमध्ये ओणम सण साजरा केला.
शरद पवार यांना राजकारणातील वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण पाहत आलो आहोत. पण बहुतांश वेळा शरद पवार हे त्यांच्या एका खास लूकमध्ये पाहायला मिळतात. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्याठिकाणची वेशभुषा केलेले पवार आपण सहसा पाहत नाही. पण केरळमध्ये नुकताच ओणम सण साजरा करण्यात आला त्यावेळी मात्र वेगळाच नजारा दिसला. ओणमच्या निमित्ताने शरद पवार यांनी केरळमध्ये पारंपरिक लुंगी परिधान करून सोहळ्यात सहभाग घेतला.

शरद पवारांचे हे फोटो राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आले आहेत. त्यावर शरद पवार यांची प्रतिक्रियाही आहे. यंदा ओणम सण केरळमध्ये साजरा करण्याचा योग आला. मुंबई-पुण्यात सुद्धा बरेच केरळवासी आहेत आणि मी त्यांच्या आनंदात नेहमीच सहभागी होतो. पण प्रत्यक्ष केरळमध्ये ओणम सण साजरा करण्याचा आनंद वेगळाच आहे, असे त्यात लिहिले आहे.
ओणम हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. केरळातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तींवर मात करत सातत्याने कृषी क्षेत्रात प्रगती केली आहे. केरळातील 'कुट्टूनाड' या प्रदेशातील शेतकरी हे पाच दशकांपासून त्रस्त होते. मी युपीए सरकारच्या काळात कृषीमंत्री असताना राष्ट्रवादीचे कुट्टूनाडचे आमदार थॉमस चंडींनी या भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. तेव्हा केंद्रसरकारने सुमारे १८०० कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजच्या सहाय्याने या भागातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारली, विकासाकडे वाटचाल करत असलेल्या या शेतकऱ्यांसाठी मी समाधानी आहे. आपल्या देशातील कृषी क्षेत्राची अशीच भरभराट होवो, ही ओणम सणाच्या निमित्ताने आज सदिच्छा व्यक्त करतो, असे पोस्ट करण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शरद पवार यांचे पारंपरिक वेशभुषेतील PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...