आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Yadav Said The Chief Minister\'s Son Has Heart In The Chest, Bihar News

बिहार : सेक्‍स स्‍कँडलमध्ये सीएम पुत्राचे नाव; शरद यादव म्हणाले, त्यालाही \'भूक\' लागते !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- जदयूचे प्रदेशाध्यक्ष शरद यादव.

पटना - बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या मुलाचे नाव एका सेक्स स्कँडलशी जोडल्या गेल्यानंतर जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी त्याच्या बचावात विचित्र प्रतिक्रिया दिली आहे. शरद यादव मंगळवारी म्हणाले की, 'सीएमच्या मुलालाही भावना आहेत. तो मुख्यमंत्र्याचा मुलगा असला म्हणून माणूस नाही का? त्यालाही इतरांप्रमाणे भूक लागते. तोही जेवण करतो. पण शरिराला फक्त जेवणाचीच गरज असते का? मानवी शरिराला इतरही अनेक गोष्टींची गरज असते. मुख्यमंत्र्यांच्या मुलाने काहीही चूक केलेले नाही.' अशा शब्दांत शरद यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा बचाव केला.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा प्रवीण मांझी याच्यावर मंगळवारी सायंकाळी एका महिला पोलिस कर्मचा-याला घेऊन आपल्या मित्रांसह बोध गया येथील होटल आर के पॅलेसमध्ये गेला होता. प्रवीण याआधी अनेकदा त्या महिलेसोबत हॉटेलात आला असल्याचाही आरोप आहे. उधारीवरून हॉटेल कर्मचारी आणि प्रवीण यांच्यात वाद झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते.

माध्यमांवर आरोप
शरद यादव म्हणाले की, 'सीएमच्या मुलाने कोणावरही बळजबरी केलेली नाही. दोन प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने काही होत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? एखाद्याने बळजबरी केली तर ते कायद्याच्या विरोधात आहे, असे म्हणता येईल. पण तुम्ही सगळे (मीडिया) मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मागे का लागला आहात, हे मला कळत नाही?

भाजपचा हल्लाबोल
भाजप नेते सुशील मोदी यांनी पोलिस हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मात्र मोदी यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यासंदर्भात माहिती मिळाली असून, प्रकरणाची चौकशी होत असल्याचेही म्हटले होते. भाजपने या प्रकरणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाच्या अटकेची मागणी केली आहे. सीएमनी या प्रकरणी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, जर माझा मुलगा त्याच्या मैत्रिणीबरोबर (गर्ल फ्रेंड) फिरत असेल, तर त्यावर कोणाला काय हरकत आहे?