आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharmila Irom News In Marathi, Divya Marathi, Manipur, Supreme Court

उपोषण सुरूच ठेवल्याने शर्मिला इरोम पुन्हा अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंफाळ - ईशान्यभारतात लष्कराला देण्यात आलेला विशेष कारवाईचा (सशस्त्र बळ कायदा) अधिकार रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिलास उपोषण सुरूच ठेवल्याबद्दल पुन्हा अटक करण्यात आली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिची सुटका करण्यात आली होती.

आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कलम तिच्याविरुद्ध लावण्यात आले अाहे. नोव्हेंबर २००० रोजी इंफाळमध्ये विमानतळानजीक आसाम रायफल्सने केलेल्या गोळीबारात १० लोक ठार झाले होते. या घटनेनंतर सशस्त्र दलास असलेला कारवाईचा विशेषािधकार रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नोव्हेंबरपासून इरोमने उपोषण सुरू केले. तिला अटक झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आले. तेव्हापासून ती गेल्या बुधवारपर्यंत रुग्णालयातच होती. उपोषण सोडण्यास नकार देणाऱ्या इरोमला नळीवाटे अन्न दिले जात होते. आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली जास्तीत जास्त एक वर्ष कैदेच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. त्यानुसार इरोमला ३६५ दिवस अटकेत ठेवता येत नाही. म्हणून ३६४ दिवस होताच तिची सुटका करून पुन्हा अटक केली जाते.

काय आहे विशेषाधिकार? : ईशान्यभारतातील मणिपूर, त्रिपुरा, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र दलांना हा विशेषाधिकार देण्यात आला आहे.