आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharukha, Hritika Three Chinese Fans Illegally Entered In Indian Bondary

शाहरुख, हृतिकच्या तीन चिनी चाहत्यांची भारतीय सरहद्दीमध्‍ये घुसखोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेह - भारतीय सरहद्दीमध्ये घुसखोरी करणा-या तीन चिनी नागरिकांनी आपण बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान व ह्रतिक रोशनचे चाहते असल्याचा दावा केला आहे. हे ऐकून सुरक्षा अधिकारी चक्रावून गेले असून त्यांच्या घुसखोरी मागील हेतूचा तपास केला जात आहे.


चिनी मुस्लिम असलेल्या तीन नागरिकांनी भारतीय सरहद्द ओलांडली. त्यानंतर जवानांनी त्यांना लगेचच अटक केली. ही घटना गेल्या महिन्यातील आहे. सालामो , अब्दुल खालिक, अदील थोरसाँग अशी या नागरिकांची नावे आहेत. तेव्हापासून ते लडाखच्या मार्गो चौकीतील कोठडीत आहेत. 12 जून रोजी त्यांना सुलतानचकू भागात अटक करण्यात आली होती.
परिस्थिती हलाखीची असल्याने भारतात प्रवेश करून पैसे कमवण्याचे आपले स्वप्न होते, असे पकडलेल्या नागरिकांनी सांगितले. त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. त्यामध्येही त्यांच्याकडून हाच दावा करण्यात आला. तिघांना यारकांडी व उघर या दोनच भाषा येतात. अद्याप त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही.18 ते 23 या वयोगटातील हे तरूण आहेत. एका भाषांतरकाराच्या मदतीने सुरक्षा जवान त्यांच्याशी संभाषण करत आहेत.